Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ६८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा आरोग्य प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ६८ रूग्ण बाधित आढळून आले आहे तर ८३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील तीन तालुका निरंक असल्याचे दिसून येत आहे.

आजची आकडेवारी
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील अमळनेर, रावेर आणि बोदवड तालुक्यात एकही रूग्ण आढळून आलेले नाहीत. तर इतर उर्वरित जळगाव शहर-२८, जळगाव ग्रामीणी-१, भुसावळ-९, चोपडा-१०, पाचोरा-१, भडगाव-२, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-५ असे एकुण ६८ रूग्ण बाधित आढळलेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालात आज एकुण रूग्ण संख्या ५३ हजार ४८९ वर पोहचली आहे. तर ५१ हजार ५८७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित ६३१ रूग्ण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आज ८३ रूग्ण बरे होवून परतलेत. आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला.

Exit mobile version