Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ३३ रूग्ण बाधित तर ५२ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यातून ३३ रूग्ण आढळून आले आहे तर ५२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, पारोळा आणि बोदवड या तालुक्यात निरंक दिसून आले आहे तर उर्वरित जळगाव शहर १९, भुसावळ-२, चोपडा-३, जामनेर-३, रावेर-२, चाळीसगाव-३ आणि मुक्ताईनगर-१ असे एकुण ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५३ हजार ७३० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आलेत त्यापैकी ५२ हजार ३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४२२ रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार २७५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Exit mobile version