Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज १५२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; १६९ रूग्ण झाले कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोनाच्या अहवालात आज १५२ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले तर आजच १६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरात कोरोनाचे रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर- ५७, जळगाव ग्रामीण- ७, भुसावळ-२४, अमळनेर-९, चोपडा-१४, पाचोरा-७, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-६, एरंडोल-१, जामनेर-८, रावेर-११, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-२, इतर जिल्हा-० असे एकुण १५२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ११,८२२ जळगाव ग्रामीण- २४८९, भुसावळ-३७८५, अमळनेर-४३४०, चोपडा-४२९७, पाचोरा-१९०९, भडगाव-१८६४, धरणगाव-२१६३, यावल-१७१३, एरंडोल-२७८५, जामनेर-३९२७, रावेर-२११९, पारोळा-२४६२, चाळीसगाव-३४६२, मुक्ताईनगर-१६७०, बोदवड-८११, इतर जिल्हा-४२३ असे एकुण ५२ हजार ४१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ४८ हजार ९३५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार ८६२ रूग्ण उपचार घेत आहे. आज ३ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण १ हजार २४४ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४.०३ टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version