जिल्ह्यात आज १३२ रूग्ण कोरोनाबाधित; २१८ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । आजही जिल्ह्यात बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक असून बाधित रूग्ण कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून दिसून आले आहे. आज जिल्ह्यात १३२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच एक रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – ४५, जळगाव ग्रामीण- ५, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-६, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-२, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-१८, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-१, इतर जिल्हा-१ असे एकुण १३२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९३.७२ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५१ हजार ८२९  रूग्ण आढळून आले असून ४८ हजार ५७३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १ रूग्णांचा मृत्यू झाला. एकुण जिल्ह्यात १२३८ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार ०१८ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content