Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना पॉझिटीव्ह; बाधितांची संख्या ४१

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४१ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 43 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या चार व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४१ इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version