Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतील, ग्रामपंचयती, स्वायत्त-संस्था मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील, महानगरपालीका, नगरपालीका, नगर परिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती, स्वायत्त संस्था, मधील सफाई कामगारांच्या अनंक तक्रारी संघटनेस प्राप्त झाले आहे.

मागण्या याप्रमाणे,
(१) वर्तमान लोकसंख्या व वाढीव क्षेत्रफळाप्रमाणे सफाई कामगारांची पदे भरण्यात यावीत.
(२) लाड पांगे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी.
(३) सफाई कामगारांना शासन निर्णया प्रमाणे मालकी हक्काची घरे मिळवून देण्यात यावी.
(४) कोविड १९ च्या महाभयंकर साथरोगाशी मुकाबला करण्यासाठी सफाई कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत.
(५) ५० वर्षे वा त्या पुढील सफाई कामगारांना भर पगारी विश्रांती देणेत यावी.
(६) शासननिर्णयाप्रमाणे कोरोना बाधीत मयत सफाई कामगारास रूपये ५० लाखाचे विमा संरक्षण त्वरीत लागू करून त्यांच्या पात्र वारसास लाभ देण्यात यावा.
(७) वरील सर्व विभागातील सफाई कामगारांना शासन निर्णयाप्रमाणे रूपये १० लाखाचे विमा संरक्षण बाबत कार्यवाही करणे.
(८) सेवा नियमा पेक्षा जास्तीच्या कामाचा मोबदला रोखीने देण्यात यावा.
वरील प्रमाणे सफाई कामगारांच्या न्याय माणण्यांचा सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version