जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते उपलब्ध करा – रविंद्र पाटील

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या जिल्हयात यावर्षी समाधनकारक पाऊस झालेला असुन शेतकरी वर्ग सुखावला आहे. तथापि आपल्या जिल्हयात रासायनिक खतांची व कृषि विषयक औषधींची उपलब्धता होत नसल्याचे निर्दशनास येत आहे. शेतकऱ्यांना खते मिळविण्यासाठी दुकानासमोर सकाळी ५ वाजेपासून रांगेत उभे रहावे लागत आहे. प्राधान्याने युरीया खतांची पिकांच्या वाढीसाठी आवश्यकता असल्याने त्याची उपलब्धता स्थानिक दुकानदारांकडं होत नाही. कृषि विभाग व दुकानदार यांना आपल्या स्तरावरुन युरीया खते व ईतर कृषि वियक खते व औषधी तात्काळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध द्यावे अशी मागणी सभापती रविंद्र पाटील यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content