Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर रासायनिक खते उपलब्ध करा – जि.प.माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खते उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना खताचा भेडसावत असलेल्या समस्या, नरेगा योजनेत मजूरांना कामे द्यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या संदर्भात जानकीराम पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या स्थितीत धरणगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी बांधवांना खताचा तुटवडा असून शेतकऱ्यांने पेरलेल्या सोयाबिन, कापूस, ज्वारी, बाजरी अशी पिके पेरलेली आहे. शेतक्यांना मात्र रासायनिक खतांसाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दरम्यान तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. जळगाव जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात खतांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर व मुबलक उपलब्ध होत आहे.

तसेच नरेगा संदर्भात दोन वर्षांपासून इस्टीमेट व टी.ए. सोडून मजूर उपलब्ध असल्यावर देखील शेतकऱ्यांसाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. मराठी शाळेचे वालकंपाऊंड ज्या तत्परतेने नरेगातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.. जर १५ लाखांचा निधी हा वॉल कंपाऊंडसाठीचा निधी असेल तर नरेगातून ३० टक्के, ३० टक्के निधी ग्रामपंचायतीच्या १४व्या वित्त आयोगामधून तर उर्वरित निधी डीपीडीसी मधून उपलब्ध करून इस्टीमेट रेट एकुण १५ लाख आहे. असे असतांना नरेगाच जे.ई. विभाग हे काम बघत असतांना ३० टक्के निधी नरेगाचा असून उर्वरित निधी हा ई टेंडरन का करण्यात येवू नये. सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती उपलब्ध असतांना त्यांना देखील गावातील काम करण्याची सोयीची आले आहे. शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात सर्व कृषि केंद्रात रासायनिक खत उपलब्ध करून द्याची अशी मागणी केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/760880434673886/

Exit mobile version