Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील विविध समस्या सोडवा; माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील रेल्वे उड्डाणपुल, जळगाव अजिंठा रस्त्याचे काम रखडले, अवैध वाळू वाहतूक आणि रेशनचा काळाबाजार यासह आदी प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सोमवारी २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून मागणी केली आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सोमवारी २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने जळगाव शहरातील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मुदतवाढ देवूनही काम अपुर्णच आहे. यामुळे शिवाजी नगरातील नागरीकांना याची मोठी अडचण निर्माण होत आहे, हे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे होत आहे. त्याचप्रमाणे जळगाव ते अजिंठा दरम्यान असलेला राष्ट्रीय महामार्गावरचा रस्ता हा देखील तीन वर्षांपासून अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही, या पूर्ण कामामुळे शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जळगाव जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळूमाफीयांची तस्करी होत असताना जिल्हा प्रशासन हातबल झालेले आहेत. त्यामुळे याला कुठेतरी अंकुश लागावा. याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. यासोबतच जिल्ह्यात रेशन धान्याचा मोठा काळाबाजार होत आहे. रेशनधान्य जिल्ह्याच्या बाहेर जावून त्याची काळ्याबाजारात विक्री होत आहे. याची चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

Exit mobile version