Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीस अटक

FIR

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला व एक वर्षाकरीता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असतांना शहरात विनापरवाना फिरत असतांना आरोपी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला आरोपी रिजवान उर्फ काल्या गयासोद्दिन शेख (वय-२२)रा. अजमेरी गल्ली, तांबापूरा याला उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षांकरिता हद्दपार केले असतांना विनापरवाना जळगाव जिल्ह्यात प्रवेश केला तसेच शहरातील तांबापूरा भागात लांबसुरा घेवून दहशत करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी आरोपी रिजवान शेख याला २८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील शिरसोली नाक्याजवळ अटक केली असून त्याच्या ताब्यातील सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पो.कॉ. गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. आनंदसिंग पाटील करीत आहे.

Exit mobile version