Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ व मनपा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे महापालिकेत आयोजन करण्यात आले.

 

आज शुक्रवार दि. २९ एप्रिल २०२२ रोजी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिरात प्रसूतीपूर्व लिंग निदान कायदा अर्थात पीसी अँड पीएनडीटी अॅक्ट या विषयावर सहा. सरकारी अभियोक्ता रंजना पाटील तसेच विवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर विशेष सहा. सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी कायद्यातील तरतुदीनुसार मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हे ए. ए. शेख यांनी विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबवले जाणारे उपक्रम आणि विविध योजनांची माहिती उपस्थितांना अवगत करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालयीन कर्मचारी बी.जी. नाईक आणि त्यांची कन्या देवयानी नाईक यांनी केले. आभार मनपा उपायुक्त श्याम गोसावी यांनी केली मानले याप्रसंगी सहा. आयुक्त अभिजित बाविस्कर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, नेहा भारंबे आणि डॉ. घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमास समांतर विधी सहायक आरिफ पटेल, आरोग्य विभाग आणि दवाखाना विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि बालवाडी विभागातील महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Exit mobile version