Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा बँकेची शाखा फोडून चोरीचा प्रयत्न

 

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शेवाळे येथील जिल्हा बँकेचे शाखेचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील शेवाळे येथे जळगाव जिल्हा सहकारी बँकेची शाखा आहे. १ नोव्हेंबर सायंकाळी ६ ते २ नोव्हेंबर सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बँकेचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सामानांची नासधुस केली. तसेच लोखंडी कपाटातील कागदपत्रांची फाईली अस्तव्यस्त करून फेकून दिल्या. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर शाखा व्यवस्थापक जिजाबराव विश्वासराव पाटील यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहे.

Exit mobile version