Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अधिकारी धारेवर

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

जळगाव, प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची वसुलीबाबत बिडीओ चुकीची आकडेवारी देत असल्याचा आरोप जि. प. सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची बिडीओंनी ७० ते ७२ टक्के वसुली दाखवून आकडेवारी फुगली आहे. मात्र,प्रत्यक्षात ग्रामपंचायतींची वसुली ५० टक्कयांच्या आतच आहे.बिडिओंनी तालुक्यातून सादर केलेली आकडेवारीमध्ये मोठी तफावत असूनही ग्रामपंचायतीचे उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी वसुलीची पडताळणी न करता हा अहवाल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा पटलावर कसा ठेवला? असा सवाल शिवसेनेचे जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन व भाजपचे जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी उपस्थित केला. मागील सभेत हा विषय नामंजूर करण्यात आलेला होता. तरीही वार्षिक प्रशासन अहवाल आजच्या सभेत मंजुरीचा घाट रचून जि.प.अधिकार्‍यांना डाव हाणून पाडला. त्यामुळे बिडीओ व उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांवर ठपका ठेवून सीईओंनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठवा,असा निर्णय सोमवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. त्याला जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील यांनी संमती दिली.तसेच पुढील टेंडर मंजुरीचे अधिकार जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील व सीईओ डॉ.पंकज आशिया यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि.३ जानेवारी रोजी जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑन लाइन घेण्यात आली. या सभेला जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राकेश पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्जवला म्हाळके,सीईओ डॉ.पंकज आशिया, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार, डिगंबर लोखंडे आदी ऑनलाइन सहभागी होते. यासभेला जि.प.सदस्य मधुकर काटे, नंदकिशोर महाजन, रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, प्रतापराव पाटील, पवन सोनवणे,गोपाल चौधरी, अमित देशमुख, प्रभाकर सोनवणे, शशिकांत साळुंके, रवींद्र नाना पाटील,पल्लवी सावकारे, अरुणा पाटील,डॉ.प्रा.निलीमा पाटील यांच्यासह इतर सदस्य चर्चेत सहभागी होते.

 

दलित वस्तीच्या कामांची चौकशी करुन पुढे काय करण्यात आले, असा सवाल जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार यांनी रावेर बीडिओंनी त्या कामांचे पैसे भरले असून २० गावांचे १० टक्के प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तसेच समाज कल्याण अधिकारी नाही का? त्यावर जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी पुढाकार घेत समाजकल्याण अधिकारी कायमस्वरुपी नाहीत.मात्र सभापती आहेत. समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी समाज कल्याण विभागाचा चांगला निधी खर्च केला.त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, अशी भूमिका कॉंग्रेसचे जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे मांडली.त्यावर सर्व सदस्यांनी त्याला दाद दिली.

Exit mobile version