Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद विषय समितींच्या रिक्त जागांवर बिनविरोध निवड

Jalgaon Zilla Parishad

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हापरिषद  अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड ४ जानेवारी रोजी झाल्यानंतर ६ जानेवारीला विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली होती. महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापती वगळता उपाध्यक्षांसह दोन सभापतींना खातेवाटप करायचे राहिले होते. मंगळवारी २८ रोजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपाध्यक्ष आणि दोन्ही सभापतींना खातेवाटप करण्यात आले. सोबतच विषय समित्यांच्या रिक्त जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.

विषय समित्यांच्या रिक्त २३ जागांसाठी आज सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात स्थायी १ , जलव्यवस्थापन १, कृषी ४, समाजकल्याण ४, शिक्षण १, बांधकाम १, वित्त १, आरोग्य २, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा ५, महिला व बाल कल्याण ३ जागा रिक्त होत्या. शिक्षण, क्रीडा-आरोग्य विभाग रविंद्र सूर्यभान पाटील, कृषी-पशुसंवर्धन दुग्धशाळा विभाग उज्ज्वला प्रशांत माळके तर उपाध्यक्ष लालचंद प्रभाकर पाटील यांना बांधकाम-अर्थ विभाग देण्यात आले आहे. स्थायी समिती सदस्यपदी अमित महेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विरोधात एकही अर्ज कायम न राहिल्याने सर्व विषय समिती सदस्यांची निवड बिनविरोध झाली.

समिती सदस्यपदी यांची वर्णी
स्थायी समिती- अमित देशमुख,  जलव्यवस्थापन समिती- रजनी चव्हाण, कृषी समिती- दिलीप पाटील,  एरंडोल पं.स.सभापती शांताबाई महाजन, मुक्ताईनगर पं.स. सभापती प्रल्हाद जंगले, जामनेर पं.स.सभापती सुनंदा पाटील, समाजकल्याण समिती- नंदकिशोर महाजन, प्रभाकर गोटू सोनवणे, भुसावळ- पं.स.सभापती मनिषा पाटील, पारोळा पं.स.सभापती रेखाबाई भिल, शिक्षण समिती- पोपट भोळे, बांधकाम समिती- बोदवड पं.स.सभापती किशोर गायकवाड, वित्त समिती- यावल पं.स.सभापती पल्लवी पुरुजित चौधरी, आरोग्य समिती- जळगाव पं.स.सभापती नंदलाल पाटील, पाचोरा पं.स.सभापती वसंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version