Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील

यावल,  प्रतिनिधी ।  जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात  संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत असोसिएशनच्या यावल तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी केली.

 

या बैठकीला महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ. निलम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार म्हणून जिप अध्यक्ष ना.रंजना प्रल्हाद पाटील यांचेसह  शिवसेना गटनेते तथा जिप सदस्य नानाभाऊ महाजन इतर जिल्हा परिषय सदस्यांत पवन सोनवणे, सुरेखा पाटील, हिंमत पाटील, पल्लवी सावकारे, नंदा सपकाळे, कैलास सरोदे, अनिता गवळे, गजेंद्र सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), सरोजिनी गरुड, माधुरी अत्तरदे, प्रमिला पाटील, अनिल देशमुख, दिलिप पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, मा.जिप सदस्य आर.जी.नाना पाटील व   जि.प. व पं.स.सदस्यांत प्रतिभा बोरोले  रावेर, प्रविण पाटील अमळनेर, अशोक पाटील पारोळा, अनिल महाजन एरंडोल, अमर पाटील जामनेर, सुभाष पाटील पाचोरा, रामकृष्ण पाटील भडगाव, शिवाजी सोनवणे चाळीसगांव यांची उपस्थिती होती.

दरम्यान,  शेखर पाटील यांची यावल तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , नईम शेख , काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, विक्की पाटील , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल , सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल, धिरज कुरकुरे, कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल , रमेश पाटील , अभ्य महाजन आदींनी त्यांचे शुभेच्छा देवुन अभिनंदन केले आहे.

Exit mobile version