Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद अध्यक्षांची रावेर पंचायत समितीत झाडाझडती

रावेर प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी येथील पंचायत समितीला अकस्मात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यात अनेक गैरप्रकार आढळून आल्याने त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना तंबी दिली.

दुपारी तीनच्या सुमारास अचानक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी येथील पंचायत समितीला भेट दिली. त्यांनी थेट मुख्य हॉल मधील कर्मचार्‍यांच्या कामकाजाच्या ठिकाणी प्रवेश करीत पाहणी केळी असता अनेक कर्मचारी जागेवर नसल्याचे तर काही बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. जि.प. अध्यक्षांनी भेट दिल्याची माहिती मिळताच अनेक कर्मचारी आपापल्या जागेवर येऊन बसले. हा बेशिस्त कारभार पाहून जिल्हा परिषद अध्यक्षा पाटील कमालीच्या नाराज झाल्या. कर्मचार्‍यांच्या कामात सुधारणा करण्याच्या तसेच प्रत्येकाच्या टेबलवर मोबाईल नंबर सहित नेमप्लेट लावण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी बीडिओंना यावेळी दिल्या.

Exit mobile version