Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेत ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्हा परिषदेध्ये  ”शिवस्वराज्य दिना”निमित्ताने  जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जि.प.मूख्यालयाच्या जुनी इमारतीतमध्ये असलेल्या अर्धकृती पुतळ्यास  शिवस्वराज्य दिनानित्ताने अभिवादन करण्यात आले. शिवस्वराज्य दिन  भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा  करण्यात आला. याप्रसंगी  जि.प.अध्यक्ष  ना.रंजना पाटीलयांच्यासह उपाध्यक्ष लालचंद पाटील तसेच सर्व खातेप्रमूख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  याप्रसंगी ना.रंजना  पाटील यांनी सर्वांना स्वराज्य दिनाच्या मनःपूर्वकशुभेच्छा दिल्या.  यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट् गीत ,पोवाङ्याचे गायन करण्यात आले. तसेच राष्ट्र गीताचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version