जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणात अटकेतील चौघांना पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दुध संघात अपहार प्रकरणात दाखल गुन्ह्यात संस्थेचे कार्यकारी संचालक मनोजय लिमये यांच्यासह इतर तीन जणांना अटक करण्यात आले होते. मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबर रोजीपर्यंत चौघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या होत्या. यातील जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी सोमवारी १४ नोव्हेंबर रात्री 9 वाजता संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरीशंकर अग्रवालयांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली होती. या कारवाईने जळगाव शहरात खळबळ उडाली होती. मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता चौघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content