जिल्हा तापमानाने होरपळला उष्माघात कक्ष, आपत्कालीन यंत्रणेसह आरोग्य विभाग सज्ज (व्हिडिओ)

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच तापला असून तापमान ४२ अंशाच्यावर पोचले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघात वा अन्य विकारांवर तात्काळ उपाययोजनाची अंमलबजावणी करीत आरोग्य यंत्रणेस सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात २७ ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची लाट येणाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून वाढत्या तापमानाच्या दुष्परिणामाची शक्यता लक्षात घेता, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुका ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यासह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलेत.

जळगाव शहरात सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत आपत्कालीन कक्षात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला असून तालुका ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात उपचार सुविधा, औषधीसाठा, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी म्हटले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याठिकाणी उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, अधिसेविका प्रणिता गायकवाड यांच्या निगराणीखाली कक्ष सुरू आहे. या कक्षामध्ये रुग्णांना दोन कुलर, छताचे पंखे, सात खाटा, उत्तम प्रकारच्या गादी आणि चादरी अशा स्वरूपामध्ये कक्ष तयार करण्यात आलेला आहे. कक्ष क्रमांक ९ मध्ये इन्चार्ज ब्रदर तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिपरीचारिका मृणाल सुरवाडे कर्मचारी संजय बोरसे सुरेश चौधरी शंकर बोयत आदी कक्षात सेवा देत आहेत.

जळगाव शहरात सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत आपत्कालीन कक्षात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला असून तालुका ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात उपचार सुविधा, औषधीसाठा, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी म्हटले आहे.

 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद  यांनी नागरिकांनी उष्मघातापासून बचावासाठी पाणी जास्त पिणे, उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

कक्ष क्रमांक नऊ येथे पहिल्या टप्प्यात पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून याठिकाणी रुग्ण दाखल झाल्यावर त्याच्यावर आवश्यक ते उपचार केले जाणार आहेत. तीन दिवस जिल्ह्यामध्ये कोणत्याही नागरिकांना उन्हाचा आघात बसल्याचे वाटत असेल तर त्यांनी कक्ष क्रमांक १ आपत्कालीन विभाग या ठिकाणी येऊन तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास त्याला कक्ष क्रमांक ९ येथे उष्माघात कक्षात दाखल केले जाणार आहे. याबाबतची आवश्यक ती औषधी आणि वैद्यकीय उपाययोजना सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4969405949810595

 

Protected Content