Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्यालयाचे/योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2020 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 1 जुलै, 2010 ते दिनांक 30 जुन 2020 या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल तर गुणवंत खेळाडू पुरस्कार एक महिला खेळाडू, एम पुरुष खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू थेट पुरस्कार देण्यात येईल. याकरीता 1 जुलै, 2015 ते दि. 30 जुन, 2020 या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, व रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सन 2020 च्या पुरस्काराकरीता दि. 30 जुन, 2020 पर्यंतची कामगीरी/कार्य ग्राह्य धरण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. 14 ते 28 डिसेंबर, 2020 पर्यंत आहे. अर्जदाराने ऑनलाईन हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचा दिनांक 28 डिसेंबर, 2020 पर्यंत असून ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट Jalgaonsports.in अशी आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीकरीता श्रीमती सुजाता गुल्हाने मो. नं. 9763231146 यांचेशी संपर्क साधवा. विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्तीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने Jalgaonsports.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन पध्दतीने भरुन सर्व कागदपत्राची हार्ड कॉपी कार्यालयीन वेळेत सादर करावी. असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version