Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा काँग्रेस भवानासमोर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने राहूल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात रविवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

 

याप्रसंगी आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिन सोमवंशी यांच्यासह महिला, पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भाजपाविरोधात घोषणा देऊन सत्याग्रहाला प्रारंभ झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, न्यायालयीन शिक्षा आणि लोकसभेतील सूडबुद्ध कारवाईला राहुल गांधी व त्यांचा परिवार तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अजिबात घाबरलेले नाही. उद्योजक अदानी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी यांच्यावर सुडाची कारवाई करण्यात आली आहे.  ईडी, सीबीआय, सीआयडी यासह विविध न्यायसंस्थांचा भारतीय जनता पक्षाने गैरवापर सुरु केला आहे. देशातील खाजगी. सरकारी संस्थांवर दडपशाही, हुकूमशाही व्हायला नको. अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. न्यायालयात अनेक खटले प्रलंबित असताना काँग्रेस  नेते राहुल गांधी यांच्यावरील खटल्याचा तातडीने कसा निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर लगेच, त्यांचे निलंबन होते हे देशात दडपशाही सुरु असल्याचे दिसून येते, असा घणाघात देखील माजी खा. डॉ. उल्हास पाटील केला.

Exit mobile version