Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

 

जळगाव. : प्रतिनिधी ।  जिल्हा उदयॊग केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांना आज  लाभार्थ्यांकडून १०  हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले

 

भुसावळ  येथील तक्रारदार पुरुष लाभार्थ्याने या प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती  त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली  आरोपी आनंद विद्यागर, (वय-५०, प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र  रा.अजय कॉलनी,रिंग रोड, जळगाव ) यांनी लाच स्वीकारलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे

 

तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी तक्रारदार यांचे प्रकरण अपलोड करून  बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 10,000/-₹ लाचेची मागणी केली  लाचेची रक्कम मागणीप्रमाणे त्यांनी स्वत: पंचासमक्ष जिल्हा उद्योग केंद्र,कार्यालय येथे स्वीकारली

सतीश डी.भामरे, ( पोलीस उप अधीक्षक),  यांनीं हा सापळा रचण्यासाठी मार्गदर्शन केले  सापळा पथकात पो नि

संजोग बच्छाव, स फौ. दिनेशसिंग पाटील, पो हे कॉ. अशोक अहीरे, पो हे कॉ. सुनिल पाटील, पो हे कॉ. रविंद्र घुगे, पो ना. मनोज जोशी, पो ना. सुनिल शिरसाठ, पो ना. जनार्धन चौधरी, पो कॉ. नासिर देशमुख, पो कॉ. ईश्वर धनगर, पो कॉ. प्रदिप पोळ, पो काॅ. महेश सोमवंशी यांचा समावेश होता .

 

Exit mobile version