Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत दिपाली सोनवणे तृतीय

पाचोरा, प्रतिनिधी ।   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव  आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या गो. से. हायस्कूल मधील दिपाली सोनवणे या विद्यार्थीनीने इयत्ता ९ वी व १० वी च्या गटातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. 

 

डायटद्वारा आयोजित स्पर्धेचा विषय “मी संशोधक वैज्ञानिक होणारच” असा होता. या स्पर्धेत एकूण १४५ स्पर्धक सहभागी झाले होते. दिपाली सोनवणे हिस शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व विजेत्यांना आणि सर्व सहभागी स्पर्धकांना ई -प्रमाणपत्र व्हाट्सएप आणि ई – मेल द्वारे पाठवले जाणार आहे. सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभास यथावकाश आमंत्रित केले जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी,  मानद सचिव महेश देशमुख, शाळेचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे आणि ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांचेसह सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन केले आहे.

 

Exit mobile version