Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे यश

WhatsApp Image 2020 02 13 at 5.30.34 PM

चोपडा ,प्रतिनिधी । जनता शिक्षण मंडळ संचलित सप्तपुट ललित कला भवन खिरोदा आणि डोम्स इंडस्ट्रीज प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लोकसेवक मधुकरराव चौधरी स्मृती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा २०२० मध्ये विवेकानंद विद्यालयाच्या दोघा विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकविले आहे.

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील खुशी शशिकांत शिंदे जिल्हास्तर द्वितीय पारितोषिक सातशे रुपये रोख, स्मृतिचिन्ह ड्रॉईंग किट, प्रशस्तिपत्र व पवन शशिकांत शिंदे विशेष योग्यता पारितोषिक १५१ रुपये, ड्रॉइंग किट, प्रशस्तीपत्र प्राप्त केले. या दोघ विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार,संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल,सचिव अॅड. रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी, मुख्याध्यापक नरेद्र भावे, मुख्याध्यापिका वासंती नागरे, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Exit mobile version