जिल्हास्तरीय कला-क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात

चाळीसगाव/पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित शासकीय निवासी शाळेत जिल्हास्तरीय कला, क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

समाज कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ९० शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित व्हावे या हेतुने कला क्रीडा अविष्कार अशा नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा जिल्हा आणि विभागस्तरावर होणार असुन त्यानुसार डेराबर्डी येथे कार्यरत आय. एस. ओ. मानांकीत समाजकल्याण विभागाची अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या प्रेरणेतुन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हास्तरीय कला, क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेत अविष्कारांतर्गत १०० मीटर, २००मीटर, ४००मीटर व रिले धावणे तसेच खो – खो, रस्सीखेच, लांब उडी, थाळी फेक या क्रीडा तसेच कला अविष्कारातील भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कला स्पर्धेसाठी अभिनय व नृत्यातुन विविध सामाजिक संदेशाचे अफलातुन सादरिकरण केले. सहाय्यक शिक्षिका वनिता बेरड, रुपाली सोनवणे, सोनाली महाजन यांचे तर क्रीडा स्पर्धेसाठी सहाय्यक शिक्षक दिलीप परदेशी, ध्रुवास राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धा यशस्वितेकरीता शिक्षक महेंद्र कुमावत, ग्रंथपाल संजय सोनवणे, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर लिंगायत यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत यश मिळवुन नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे जळगांव समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाकडुन कौतुक करण्यात आले.

Protected Content