Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय एरिअल स्पोर्ट्स स्पर्धेत प.वि.पाटील विद्यालयाचे यश

जळगाव (प्रतिनिधी)- जिल्हा एरियल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्हास्तरीय एरियल स्पोर्ट्स स्पर्धेचे आयोजन विद्या इंग्लिश मेडिअम स्कुल जळगाव येथे करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाने आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत वैयक्तिक स्पर्धेत 9 ते 12 वर्षाच्या वयोगटात कीर्ती तायडे या विद्यार्थिनीने एक रजत पदक प्राप्त केले. तर सांघिक क्रीडा प्रकारात शाळा तृतीय क्रमांकाची विजेता ठरली. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 11 शाळांमधील 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

यांची होती उपस्थिती
विजयी स्पर्धक व संघाला जळगाव जिल्हा एरियल स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष मनोज अडवाणी, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव नरेंद्र भोई, विजय विसपुते, विद्या इंग्लिश स्कुलचे मधुरा थत्ते, प्रशासकीय अधिकारी कामिनी भट, सुभाष चौधरी, चंद्रकांत देवरे यांच्या हस्ते पदक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक योगेश भालेराव यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले तर उपशिक्षिका कल्पना तायडे, सरला पाटील, दीपाली चौधरी, सुधीर वाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, शालेय समन्वयक के.जी.फेगडे, मुख्या.रेखा पाटील, ए.टी.झांबरे विद्यालयाचे मुख्या डी.व्ही.चौधरी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version