Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत गितेश पाटील प्रथम

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा ज्युनियर गट अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल जळगावात नुकतीच घेण्यात आली असून या स्पर्धेत यावल तालुक्यातील किनगाव डोणगाव रोड वरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचा विद्यार्थी गितेश पाटील(डोणगाव) याने प्रथम क्रमांक पटकवला.

गितेश याला स्कुलचे क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले व यावल तालुका अँथलेटिक्सचे सचिव जितेंन्द्र फिरके यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. जुनियर गट अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल गितेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गितेशने मिळवलेल्या यशाबद्दल इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन विजयकुमार पाटील, सचिव मनिष पाटील, व्यवस्थापक पुनम पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य राजश्री अहिरराव, हर्षल मोरे, योगीता बिहारी, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, नेहा धांडे, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक एम.तायडे, पुजा डी.शिरोडे, तुषार धांडे, बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version