Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हावाशियांनी शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करा; आरोग्यविषयक शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे – जिल्हाधिकारी राऊत

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, तसचे शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक शिबीर घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सुचनांनुसार शिवजयंती साजरी करतांना संपुर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे जसे सार्वजनिक पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादीचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.  कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम फक्त 100 व्यक्तीच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती  करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम  पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

Exit mobile version