Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकाऱ्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयास भेट

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव ग्रामीण रुग्णालयास  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट दिली. याप्रसंगी तहसीलदार नितीन कुमार देवरे, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत धरणगाव शहरातील विविध विषयांवर चर्चा केली.

 

धरणगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धरणगाव शहर शिवसेनावतीने कोविड लसीकरण कॅम्प आजपासून पुढील १० दिवस लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिली. या लसीकरनाला नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. आज रोजी शहरात मोरवडी परिसर व मोठा माळी वाडा परिसर येथे एकूण १५०० नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version