Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व बचत गट भोजनालयाचे उदघाटन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत येथे आढावा बैठकीसह आदिवासी महिलांच्या बचत गट भोजनालयाचे उदघाटन करण्यात आले.

 

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी  येथील तहसील कार्यालयास गुरुवारी भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचा आढावा घेतला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग नगरपालिका, पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत अडी अडचणी संदर्भात विचारण्यात आल्या.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावल पोलीस स्टेशनला भेट देवुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना नंतर अट्रावल गावाच्या सद्य परिस्थिती व दंगलीची सविस्तर माहीती जाणुन  घेतली, बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास कडलग उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजित निंबाळकर, वनविभागाचे विक्रम पदमोर, यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पी. बी. देसले , महीला व बालविकास प्रकल्पच्या अर्चना आटोळे यांचे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,  भुसावळ रस्त्यावरील दूरध्वनी कार्यालयाजवळ पेट्रॉलपंपाच्या शेजारी आदिवासी विकास प्रकल्प विभागा च्या न्यूक्लिअस योजनेअंतर्गत आदिवासी महिलांच्या बचत गटाला खादय ढाबा साठी ८५ % टक्के अनुदान योजनेस आयुक्त नयना गुडे व अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडुन मान्यता मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्वातील यावल चोपडा व रावेर या ठिकाणच्या खाद्य ढाब्यांना मान्यता मिळाली असुन , यावल तालुक्यातुन या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे.

यावल येथे एकलव्य आदिवासी महिला बचत गटाच्या नाश्ता  भोजनालय केन्द्राचे उद्घाटन जळगावचे  जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार महेश पवार आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्युक्लिअस बजेट योजनेचे सहाय्यक पवनकुमार पाटील , सहाय्यक प्रकल्प अधिकारी जे आय तडवी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे , सहाय्यक लेखा अधिकारी पी व्ही रोकडे यांच्यासह एकलव्य आदीवासी महिला बचत गटाच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या .

Exit mobile version