Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी समर्थनार्थ किसान बाग आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम समाजातर्फे किसान बाग आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे किसान बाग आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रामदास इंगळे यांनी केले.  देशाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. त्याला बरबाद करणारे तीन काळे कायदे जबरदस्तीने त्यांचेवर लादले जात आहेत, शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव मिळत नाही म्हणून दिल्लीच्या बॉर्डरवर लाखो शेतकरी आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहे.  कडाक्याच्या थंडीत ही चिवटपणे अनेक संकटाचा सामना करत सरकारला विनंती करत आहे,  मात्र केंद्र सरकारच्या अडमुठे आणि व्यापारी धार्जिणा धोरणामुळे शेतकऱ्यांच्या न्याय मागणी धुडकावले जात आहे. पोशिंदा जगला तर आप जनतेस अन्न मिळेल तेच धान्य मूळभर व्यापारी घराण्याच्या गोदामात गेले तर जनता अन्न अन्न करून तडफडून मरून जाईल अशी अवस्था होवू नये. शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात आले पाहिजे यासाठी शेतकऱ्यांच्याआंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दिल्लीत झालेल्या शाहिन बाग आंदोलनाच्या धर्तीवर किसान बा गआंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, उपजिल्हाध्यक्ष दिगंबर सोनवणे, जिल्हा महासचिव गमीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खाटीक, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाळासाहेब पाटील,  महानगराध्यक्ष जितेंद्र केदार, शरीफ खाटीक, तौसिफ शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, जिल्हा महिला महसचिव फिरोजा शेख, महानगराध्यक्षा कविता सपकाळे, जिल्हा उपाध्यक्षा रेखा शिरसाट,  पंचशीला आराक, संगीता मोरे, किबलिस पटेल, माया खैरनार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित  होते. 

Exit mobile version