Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे थाळी नाद आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणातील अकरा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुप्रिम कोर्टाने रद्द केली आहे. दरम्यान आरोपींची शिक्षा कायम करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुन्नी मुस्लिम बांधवांच्या वतीने थाळी नाद आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुजरात राज्यात सन २००२ मध्ये सामूहिक अत्याचार व ७ निष्पाप लोकांचा झालेल्या हत्या प्रकरणात ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतू गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी या सर्व आरोपींना कारागृहातून सोडून देण्यात आले आहे. पंतप्रधान यांनी महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, महिला सन्मान हक्क, तिल तलाक या कायद्याने मुस्लिम महिलांना दिलेली सुरक्षा या सर्वांचा गुजरात सरकारने अपमान केला आहे. त्यामुळे तातडीने ११ आरोपींची रद्द केलेली शिक्षा कायम करावी या मागणी साठी जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व थाळी नाद आंदोलन करण्यात आले.

या निवेदनावर सैय्यद सिनिम बेगम अयाज अली, सैय्यद शगुफ्ता नियाज अली, तबसुमबी शेख रहीम, गजालाबी बशीर, सैय्या अयाज अली नियाज अली. शेख जमील शरीमोद्दिन, शेख शाकी शेकख अय्युब, शेख सागिब अहमद बहाब, शेख सलीमुद्दीन, तौसिफ यासीन कुवेशी, शेख शफिक अहमद, शेख सलमान शेख महेबुब, रईस खान यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version