जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वन्यजीव संरक्षण संस्था व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने जळगाव जिल्ह्यात जनजागृती करणाऱ्याला रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला.

यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील पाटील यांच्यासह वन्यजीव संरक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विनोद ढगे व ग्रुपने पथनाट्य सादर केले. याद्वारे प्राण्यांची शिकार करू नका…. पर्यावरणाचे संवर्धन करा असा संदेश देण्यात आला.

रॅलीमध्ये वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालय ते टावर चौकापर्यंत भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅलीच्या माध्यमातून दोन दिवस जळगाव जिल्ह्यात भुसावळ मुक्ताईनगरसह विविध गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहेत.

Protected Content