Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयातून जप्त वाळूचे डंपर चोरुन नेले

जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलच्या पथकाने कारवाई करुन जप्त केलेले वाळूचे डंपर चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागाच्या पथकाने 12 रोजी जानेवारी विना परवाना वाळूची वाहतूक प्रकरणी कारवाई करुन डंपर (क्र एम.एच. 19 झेड 1644) जप्त केले होते. वाळू वाहतुकीचा परवाना तसेच दंड न भरल्याचे दिसून न आल्याने सदरचे डंपर पथकाने पथकाने जप्त करुन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभे केले होते.
12 जानेवारी ते 14 जानेवारी 2019 दरम्यान सदर डंपर कोणीतरी व्यक्तीने शासनाचा महसूल बुडविण्याचे उद्देशाने कोणताही दंड न भरता पळवून नेले. दरम्यान 2 लाख 39 हजार 292 हजार चे डंपर चोरी प्रकरणी मंगळवारी महसूलचे लिपीक परवेश अहमद शेख रा. अथर्व पार्क, विवेकानंदनगर यांनी दिलेल्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भाग 5 गुरन 5/19 भादवी कलम 379,34 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्सटेबल शिवाजी पवार हे करीत आहेत.दरम्यान यापूर्वी अनेकदा अशा घटना समोर आल्या असून जिल्हाप्रशासनाकडून कुठलीही उपयायोजना करण्यात येत नसल्याने वाळूमाफियांची हिंमत वाढल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version