Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार !

 

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना एका तरुणाने सोशल मिडीयावर ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ अशी धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तरुण करत आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात पडसाद उमटत आहे. विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर एका तरुणाने ट्विटरला कमेंट करताना ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ अशी थेट धमकी दिली आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली आहे.

Exit mobile version