Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जालन्यात मध्यरात्री महिलेची निर्घुण हत्या ; १० जणांना अटक

जालना (वृत्तसंस्था) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास लोखंडी रॉड ,चाकू आणि काठीने मारहाण करुन महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरातील काजीपुरा भागात घडला. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १० जणांना अटक करण्यात आली आहे. हिना सय्यद माजीद असे मृत महिलेचे नाव आहे.

 

 

 

यासंदर्भात सय्यद माजिद यांनी बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची पत्नी हिना खान व तिचे नातेवाईक यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होता. यातूनच रविवारी मध्यरात्री संशयित आरोपी अरबाज खान जफर खान, शाहबाज जफर खान, शेख अजगर शेख अब्दूल वहाब, अकबर धूम अली शाह, इस्माईल शाह व अन्य सहा महिलांनी फिर्यादी सय्यद माजिद सय्यद कय्यूम यांच्या काझीपुरा येथील घरात घुसून त्यांना व त्यांची पत्नी हिना यांना लोखंडी रॉड, काठी व चाकूने वार करुन जबर मारहाण केली. यात हिना सय्यद माजिद यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती फिर्यादी सय्यद माजिद हे गंभीर जखमी झाले.

Exit mobile version