Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर येथे विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी!

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका शाळेत एका विद्यार्थ्याला चार ते पाच विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालकही जामनेरला पोहोचले असता यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील एका शाळेमध्ये काहीतरी क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याला चार-पाच विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांना निरोप दिला तोपर्यंत शाळा सुटली होती. मात्र काही मारहाण करणारे विद्यार्थी हे वाकी रोडवरील एका कोचिंग क्लासमध्ये होते. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोचिंग क्लास गाठत विद्यार्थ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तू-तू मै-मै झाली त्यामुळे वाकीरोडवरील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर तणावाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, जामनेर शहरांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे प्रकार वाढले असून महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरी तयार झाली आहे. परिणामी विद्यार्थिनी व मुलींना मोठा त्रास सहन करावा लागतो, वेळोवेळी जामनेर शहरातील विविध महाविद्यालय व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मारहाण व भांडण वाढत चालली असून हे थांबवण्यासाठी सदर घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासन व महाविद्यालय शाळेनी सुरक्षारक्षक वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version