Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात!

जामनेर, प्रतिनिधी| येथील नगरपालिकेच्या चौकात महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जामनेर येथील नगरपालिकेच्या चौकात आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान जसे वाल्या कोळीचे वाल्मीक ऋषी झाले. त्यांनी वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गात येऊन रामायण सारखा ग्रंथ लिहिला. त्याच प्रमाणे आपण सर्वांनी वाईट मार्ग सोडून चांगला मार्ग पत्करावे असे आव्हान नगराध्यक्षा साधना महाजन यांनी यावेळी केले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते छगन दादा झाल्टे, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती अतिश झाल्टे, उपनगराध्यक्ष शरद पाटील, मनपा गटनेते डॉ. प्रशांत भोडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, नगरसेवक अतिश झाल्टे, महेंद्र बाविस्कर, नाना वाणी, उल्हास पाटील, दत्तात्रय सोनवणे, रतन गायकवाड, दीपक तायडे, पंढरी पाटील ( टायगर)बी. आर. पाटील, संतोष कोळी, दिनेश पाटील, विजय शिरसाट यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version