Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुक्यात जनता कर्फ्यु बंदमध्ये नागरीकांचा सहभाग

जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यातील नागरिकांना जनता कर्फ्युला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देवून कोरोना मुक्त समाजासाठी बंदमध्ये सहभागी झाले.

अत्यावश्यक काम असेल तरच नागरिक आवश्यक त्या उपाययोजना करून बाहेर पडले. येथील बाजारपेठ, गांधी चौक, मुस्लिम वस्ती, नगरपालिका चौक, भुसावळ चौफुली, मेनरोड परिसर, बसस्थानक परिसरात आज सकाळ पासुनच शुकशुकाट दिसला. शासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक सेवा सोडून सर्वं दुकाने, व्यवसाय १०० टक्के बंद केलेली आहे. तालुक्यातील सर्व व्यापारी, दुकानदार वर्गाने कडकडीत बंद पाळला आहे. असून शहरातील सर्वच छोट्या मोठ्या धंदेवाले आपापले व्यवसाय बंद ठेवले आहे.पोलिसांकडून वारंवार आव्हान करण्यात येत असुन सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली सेवा बजावत असतांना दिसत आहे.

Exit mobile version