Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुक्यात अंथरूणावर खिळून असलेल्या व्यक्तींना व दिव्यांगांना मिळणार घरपोच रेशन

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील अंथरुणावर पडलेल्या शंभर टक्के दिव्यांग व अंथरुणावर पडलेल्या व्यक्तींना शासनाकडून विशेष योजनेअंतर्गत ऑन दी स्पॉट अंतोदय रेशन कार्ड व ३५ किलो धान्य घरपोच वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ सुनसगाव येथून करण्यात आला.

 

तालुक्यातील शंभर टक्के दिव्यांगांना मिळणार ऑन दी स्पॉट रेशन कार्ड व धान्य वाटपाचचा उपक्रम तहसीलदार अरुण शेवाळेंनी चालू केला आहे. याबाबत सुनसगावचे उपसरपंच दत्ता साबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती मागणी केली होती. यावेळी सुनगाव येथील योगेश समाधान चौधरी व संदीप एकनाथ महाजन हे दोघे अंथरुणावर पडलेले असून त्यांना ऑन दी स्पॉट अंतोदय रेशन कार्ड देण्यात आला. यावेळी पुरवठा अधिकारी विठ्ठल काकडे, सुनसगाव उपसरपंच दत्ता साबळे, समाधान पाटील, विजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या काही दिवसापूर्वी सुनसगाव उपसरपंच दत्ता पाटील यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांना लेखी निवेदन देऊन शंभर टक्के अंथरुणावर पडून असलेल्या व्यक्तींचा रेशन कार्डचा लाभ मिळावा अशी मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत तहसीलदार अरुण शेवाळे यांनी जामनेर तालुक्यातील ज्या अपंग व्यक्तीचे आधार कार्ड निघू शकत नाही, त्यांचे थम येत नाहीत, कुठल्या प्रकारचा आधार कार्ड बनवण्यात त्रास होतो. त्यामुळे त्यांना रेशन भेटू शकत नाही अशा जामनेर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या शोध घेऊन डायरेक्ट ऑन द स्पॉट अंथरूणावर पडलेल्या व शंभर टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना अंतर्गत तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या आदेशाने तालुक्यातील शंभर टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीची माहिती घेऊन त्यांना थेट अंतोदय रेशन कार्ड व ३५ किलो धान्याचे वाटप केले जाणार आहे. यात धान्य घेण्यासाठी थम लागतो, मात्र शंभर टक्के दिव्यांग असल्यामुळे यांचे थम मशीन वर लागत नाही, अशा व्यक्तींचा लागत नसल्यामुळे त्यांच्या घराशेजारील एखाद्या व्यक्तीच्या थम चालणार आहे व या शंभर टक्के दिव्यांग व्यक्तींना घरपोच रेशन धान्य पोहोचवण्याच्या सुद्धा सुविधा केली जाणार आहे. अशाप्रकारे एकाच ठिकाणी अंथरुणावर पडलेले शंभर टक्के दिव्यांका ची माहिती द्यावी असे आव्हानअसल्याची तहसीलदार महेश शेवाळे यांनी केले आहे.

तहसीलदार अरुण शेवाळे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की,  जामनेर तालुक्यातील एका ठिकाणी अंथरुणावर पडलेल्या शंभर टक्के दिव्यांग व्यक्ती यांचे आधार कार्ड बनत नाही थम लागत नाही अशा व्यक्तींची माहिती घेऊन विशेष योजनेअंतर्गत त्यांना अंतोदय रेशन कार्ड देण्यात येईल. प्रतिमहा ३५ किलो धान्य घरपोच मिळावा अशी सुविधा उपलब्ध करणार असून त्यांच्या थम लागत नसल्याने शेजारच्या व्यक्तीच्या थम वर त्यांना धान्य दिले जाणार आहे. याचा शुभारंभ सुनसगाव येथून करण्यात आला आहे.

Exit mobile version