Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुका पंचायत समितीस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

 

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षण विभागच्या शिक्षक यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मान्यवरांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकाला बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, विस्तार अधिकारी रमेश दुसाने, विष्णू काळे, विजय सरोदे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, सुरेश अंभोरे यांच्यासह दत्तात्रय धूडाळे, भानुदास पाटील, बाबुराव जोंधळे, शुभांगी पाटील, संदीप पाटील, किरण पाटील, नवल राजपूत, विकास वराडे, प्रदीप जाधव, चंद्रकांत फिरके उपस्थित होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये गटशिक्षणाधिकारी यांनी बोलताना सांगितले की. शिक्षकांच्या अशाप्रकारे विविध स्पर्धा घेतल्यामुळे त्यांचाही कलागुणांना वाव मिळते. विजेत्यांनी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे कारण शिक्षकांमधले वेगवेगळे गुन्हा मुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक व शारीरिक विकास होण्यास फायदा होईल. जिल्हा परिषद शिक्षक स्पर्धेमध्ये विविध खेळ खेळण्यात आले. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो, कबड्डी, कॅरम इत्यादी क्रीडा इत्यादी खेळाचे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी पुढील प्रमाणे कार्यक्रमात विषय तज्ञ शिक्षक उपस्थित होते प्रस्तावना सलीम शेख सूत्रसंचालन संदीप पाटील आभार किरण पाटील यांनी केले.

 

Exit mobile version