जामनेर तालुका काँग्रेसच्या वतीने धरणे; इंधनदर कमी करण्याची मागणी

जामनेर प्रतिनिधी । कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने देशातील लाखो सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला आहे. अश्या परिस्थितीत देशात पेट्रोल व डिझेलची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या झळ बसत आहे. त्यामुळे इंधनदर कमी करण्यासाठी येथील जामनेर तालुका काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या काळात सगळेच कोरोनाच्या महामारीने त्रस्त झाले आहे. या संकटाने देशातील लाखो सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला आहे. उद्योगधंदे अजुनही पुर्वपदावर आलेले नाहीत व केव्हा पुर्व पदावर येतील हेही अजून निश्चित नाही. अशा दुहेरी संकटाचा सामना करताना सर्वसामान्यांची पोट भरण्यासाठी तारांबळ होत आहे. त्यातच भर म्हणून आता पेट्रोलमागे प्रति लिटर रूपये ९.१२, तर डिझेल प्रति लिटर ११.०२ रूपये दरवाढ करण्यात आली आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती पाहता इंधनाच्या किंमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी एक दिवसीय धरणे आंदोलन करून जामनेर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी एस.टी पाटील, मुलचंद नाईक, गणेश झाल्टे, मुसा पिंजारी, राहुल पाटील, रफीक मौलाना, इद्रीस पटेल, मंजूर जलालखान, अ.रऊफ शेख महेमुद आदीच्या मागणी निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Protected Content