Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागेसाठी ३४ उमेदवार रिंगणात

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माघारी अखेर चित्र स्पष्ट झाले असून भारतीय जनता पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढत असून भाजपचे १७ जागेसाठी सतरा उमेदवार रिंगणात असून शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे १७ जागेसाठी सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सरळ लढत असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असून ईश्वर बाबूजी जैन गटाने आपले संपूर्ण उमेदवार ची माघार घेतली असून सहकारात आम्ही ना. गिरीश महाजन यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. हमाल मापारी मतदारसंघातून भाजपाचे तुकाराम निकम हे आधीच बिनविरोध निवडून आल्याने विजयाच्या दिशेने भाजपने खाते उघडले असल्याचे बोलले जात आहे.

सोसायटी मतदारसंघाच्या जनरल मधून भाजपातर्फे धनराज सिताराम चव्हाण (लिहा ),तुकडूदास नाईक (खडकी), सुभाष त्र्यंबक पाटील (दोंदवाडे), शिवाजी आत्माराम पाटील (गोरनाळा ),सुभाष रामकृष्ण सिंनगारे (वडाळी), पद्माकर हरी पाटील (सोनाळा), महेश शिवाजी देशमुख (वाकोद). तर महाविकास आघाडीतर्फे एड. ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे (लोणी), किशोर श्रीराम पाटील (सोनारी), शिवाजी पुंडलिक पाटील (टाकरखेडा ),युवराज नारायण पाटील (एकुलती), चरण सिंग सुखदेव पवार (गोंदेगाव तांडा )’योगेश भागवत बनकर (पहुर), अण्णा मधुकर पाटील (डोहरी).हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण मधून भाजपा तर्फे राजमल भागवत (लोंन्ड्री), अशोक प्रल्हाद पाटील (गारखेडा), हे रिंगणात असून महाविकास आघाडी तर्फे अमोल रमेश पाटील ,रघुनाथ नारायण पाटील, हे निवडणूक लढवीत आहे. अनुसूचित जाती जमाती मधून भाजपातर्फे दिलीप समशेर गायकवाड तर महाविकास आघाडीतर्फे नंदू सिताराम इंगळे हे निवडणूक रिंगणात आहे. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून भाजपा तर्फे वासुदेव घोंगडे (पहूर), हे निवडणूक लढवीत असून महाविकास आघाडी तर्फे मयूर सुभाष पाटील हे रिंगणात उतरले आहे. ओबीसी मतदारसंघातून भाजपातर्फे अशोक भोईटे (बेटावद), तर महाविकास आघाडी तर्फे ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील (तोंडापूर) यांचे तर लढत आहे.

महिला राखीव मतदार संघातून भाजपातर्फे संगीता अनिल पाटील (ढालगाव), उज्वला सुभाष वाघोडे (नेरी), तर महाविकास आघाडी तर्फे प्रमिला राघो पाटील (पारधी), कविता निलेश भगत (वाकोद) यांचे लढत होणार आहे. व्ही. जी. एन .टी. मतदारसंघातून भाजपातर्फे संजय देवराम देशमुख (पहुर ),तर महाविकास आघाडी तर्फे शैलेश कृष्णा पाटील( पहुर )यांचे लढत होणार आहे.

व्यापारी मतदारसंघातून भाजपातर्फे चंद्रशेखर काळे (पळासखेडा मीराचे), सुनील कलाल (जामनेर ),तर महाविकास आघाडीतर्फे या मतदारसंघातून धोंडू सजन पाटील हे एकच उमेदवार रिंगणात आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे जामनेर तालुक्यात सहकारातही मोठे वर्चस्व असून गेल्या दहा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे .याही निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version