Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात ‘श्रीराम जन्मोत्सव’ उत्साहात साजरा ; मिरवणुकीत आमदारांनी धरला मनसोक्त ठेका

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमी निमित्त ‘श्रीराम जन्मोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने काढलेल्या निमित्त भव्य मिरवणुकीत माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी ‘डी.जे.’वर चढून मनसोक्त ठेका घेतला.

श्रीराम पेठमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ‘गणेशवाडी मित्र मंडळा’तर्फे श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील नगरसेवक महेंद्र बाविस्कर सुहास पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

जामनेर शहरांमध्ये ‘श्रीराम नवमी’ निमित्त सर्व शहरवासियांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळी बारा वाजता श्रीराम पेठमधील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कचरूलाल बहरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सायंकाळी सहा वाजता गणेश वाडी मित्रमंडळातर्फे श्रीराम यांच्या मूर्तीचे प्रतिमा पूजन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश वाडी, गांधी चौक, नगरपालिका चौक मार्गे परसावर श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि हनुमान यांची सजीव व आरास मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक व महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी जामनेर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

Exit mobile version