Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात रुबी हॉस्पिटलमध्ये कथलॅब सुविधेचा शुभारंभ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रुबी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटका येतो यावर रुग्णांसाठी उपचार तात्काळ मेळावा या माध्यमातून येथील रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये कथलॅब सेवेचा शुभारंभ नगराध्यक्ष साधना महाजन व हृदयरोग सर्जन डॉ.अजय चौरसिया यांच्या हस्ते करण्यात आला..

यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नवल पाटील, डॉ. अमित भंगाळे, जळगाव रुबी स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ.गिरीश अय्यर, डॉ. रितेश पानवाल, डॉ. नसीर अन्सारी, डॉ. प्रतीक महाजन, डॉ. राजेश नाईक, डॉ. प्रशांत नेते, डॉ. रश्मिता मुजुमदार, डॉ. हर्षल पिसाळ , डॉ. विश्वनाथ चव्हाण, भाजपा ज्येष्ठ नेते शंकर आप्पा मराठे यांच्यासह मान्यवर नागरिक व रुबी स्टार रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. कथलॅब सुविधेमुळे जामनेर शहराचा तालुक्यातील रुग्णांना आता जळगाव औरंगाबाद जाण्याची त्यांच्यावर येथेच उपचार होणार आहे. त्यामुळे आता रुग्णांना याची सुविधा मिळणार असल्यामुळे तालुका वाशी यांना या सेवेचा फायदा मिळणार आहे.

Exit mobile version