Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामडी येथील कोरोना बाधीताच्या संपर्कात १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामडी येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात असलेल्या १६ जणांच्या चाचणीचे अहवाल हे निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, भडगाव येथील एकाच्या अंत्यंस्कारात सहभागी झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला होता. यानंतर प्रशासनाना तातडीने या महिलेच्या कुटुंबियांसह तिच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन केले होते. यातील १६ जणांचे स्वॅब सँपल्स हे तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असून चाळीसगावचे वैद्यकीय अधिक्षक तथा कोविड नोडल अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Exit mobile version