Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामठी येथे तरूणाची दुचाकी लांबवितांना चोरट्याला पकडले

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील जामठी गावातील तरूणाची दुचाकी लांबविणातांना नागरीकांनी रंगेहात पकडले. ७ जानेवारी रोजी ही घटना घडली असून चोरट्यास बोदवड पोलीसांच्या स्वाधिन केले व त्याच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल काशीनाथ तेली (वय-३८) रा. जामठी ता. बोदवड यांच्याकडे दुचाकी (क्रमांक एमएच १९ बीव्ही ५१७८) आहे. शेतीचे काम करत असल्यामुळे कामासाठी दुचाकीचा वापर करतात. ६ जानेवारी रोजी सायंकाळी दुचाकी घरासमोर लावलेली असता चोरटा वैभव सुनिल शिरसागर (वय-१९) रा. मोलखेडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद याने दुचाकी चोरून नेत असतांना दिसून आला. नागरीकांच्या सतर्कतेने त्याला पकडून बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमोल तेली यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन चौधरी करीत आहे.

Exit mobile version