जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचे धरणे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । संविधानिक अधिकार असूनही महाराष्ट्रातील ३० ते ३५ अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या संदर्भात आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने निवेदन जारी केले आहे. यात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार,कोळी ठोर, टोकरे कोळी, ठाकर, ठाकूर,मननेरवरलू, हलबा, माना, गोवारी, तडवी, भिल्ल आदी जमातींना जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही. अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडून नेहमीच बेकादेशीर घटनाबाह्य वागणे दिला जात असून त्यांच्या जमातीचे दाखले कोणतेही पुरावे विचार न करता सरळ रद्द केल्या जात आहेत. अन्यथा त्यांनी दिलेल्या कोणत्याही महसूल व अन्य पुराव्याचा विचार केला जातो. यामुळे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न जात पडताळणी समिती मार्फत सातत्याने होत आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व आदिवासी विकास विभाग व जात पडताळणी समित्या यांनी आमच्यावरील जमातीना न्याय दिलेला नाही. या न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे याच मागणीसाठी २८ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण आयोजित केलेल्या या वेळी मंगला सोनवणे, अनिल ननावरे, डॉक्टर राजेंद्र सावळे, राहुल विनायक कोळी आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content