Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जात निहाय जनगणना व मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती तेली समाजाला मिळाव्यात

 

चोपडा, प्रतिनिधी । जात निहाय जनगणना व मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती तेली समाजाला मिळाव्यात यासह इतर मागण्यांचे निवेदन तालुका तेली समाज महासभेतर्फे नायब तहसीलदार संजय ईखनकर यांना देण्यात आले.

ओबीसींची जात निहाय जनगनणेची मागणी केंद्र सरकारने फेटाळली. त्याची तीव्र नाराजी पसरली. त्यामुळे नव्याने ही मागणी करण्यात येत आहे. यासोबतच ओबीसींसाठी ५२ % आरक्षण असावे, हिमाचल प्रदेशात तेली समाजाला मागास जातीत समाविष्ट करण्यात आले आहे. तोच नियम संपूर्ण देशात लागू करावा, ओबीसीमध्ये आणखी जाती समाविष्ट करू नये, क्रीमीलीअरची अट बंद करावी. ओबीसींमधील जाती व पोट जाती असा भेदभाव असू नये या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

तेली समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता समाज आरक्षणापासून वंचित आहे. मागण्या त्वरित मंजूर कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदरचे निवेदन म . मुख्यमंत्री सो, महा महीम राष्ट्रपति सो व मा . प्रधानमंत्री सो. यांचे कडे त्वरित पाठविण्यात यावे असे संस्थेचे अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी सांगितले. तसेच नायब तहसीलदार यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

निवेदनावर ऊपाध्यक्ष विश्‍वास चौधरी, सचिव टी. एम. चौधरी, प्रशांत सुभाष चौधरी, जे. के. थोरात, राजेंद्र चौधरी, ज्ञानदीप चौधरी, नंदलाल चौधरी, भगवान चौधरी, प्रभाकर चौधरी, विनोद चौधरी, गिरीश चौधरी, पिंटू चौधरी, ईश्वर चौधरी, गोवर्धन चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी, भिका चौधरी, भटू चौधरी, शालिग्राम चौधरी , ए . बी. चौधरी, संजय चौधरी, मच्छिंद्र चौधरी, मिलिंद चौधरी, गोपीचंद चौधरी, सुनील चौधरी, लक्ष्मण चौधरी, लखन चौधरी, पूनमचंद चौधरी, एन. जी. चौधरी, आर. बी. चौधरी, संजय पांडूरंग बागूल, ललेश चौधरी, अशोक चौधरी, नकूल चौधरी, गोकुळ चौधरी, डी. जे. शेलार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version