Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जातीच्या दाखल्यांचे पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने घरपोच वाटप

 

पाचोरा , प्रतिनिधी । तालुक्यातील १३ गावातील भिल्ल समाजाच्या नागरिकांना पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड यांनी पुढाकार घेत घरपोच जातीचे दाखले वाटप केलेत. 

भिल्ल समाजातील गोर – गरिब नागरिकांना शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक असणारे जातीच्या दाखल्याची अडचण  भेडसावत असतांनाच शासनाच्या विविध योजनांपासुन अनेकांना वंचित राहावे लागत होते. याबाबत अनेकांनी पाचोरा पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांच्याकडे जातीचे दाखले मिळावे याकरिता मागणी केली होती. याविषयी सभापती गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचेकडे भिल्ल समाजातील गरजुंना जातीचे दाखले मिळणेसाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन १३ गावातील ११७ लाभार्थ्यांना घरपोच जातीचे दाखले वाटप केले आहे.  यात नगरदेवळा – बाळद जिल्हा परिषद गटातील भोरटेक खु” – २४, पिंप्री बु” प्र. पा. – १७, टाकळी बु” – ५, निपाणे – ५, चुंचाळे – १२, संगमेश्वर – ५, बाळद बु” – १७, दिघी – ४, सार्वे बु” प्र. भ. – १०, बदरखे – १५, आखतवाडे – १, घुसर्डी – १, अंतुर्ली खु” प्र. पा. १ अशा १३ गावातील ११७ भिल्ल, आदिवासी समाजाच्या गोर – गरिब नागरिकांना पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांचे हस्ते घरपोच वाटप करण्यात आले. यावेळी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष देविदास बहिरम, किशोर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी भिल्ल समाजाच्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील व पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड यांचे आभार मानले.

 

 

Exit mobile version